SHARE

जुहू - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपात चांगलाच कलगितुरा रंगलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुहूमधल्या सभेत शिवसेनेवर टीका केली आहे. ज्या शक्तींविरुद्ध शिवसेनाप्रमुख लढले, आज त्यांचीच साथ घेण्याची वेळ शिवसेनेवर यावी हे दुर्दैव आहे. नोटाबंदीमुळे सामान्य माणूस दुखावला नाही, तर ज्यांचा काळा पैसा बुडाला तेच ओरडत आहेत. तुम्ही कोणत्या रांगेत आहात? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महापालिकेला 120 कोटी रुपये दिले. पण 5 वर्ष काहीच झाले नाही. मात्र त्याची किंमत 170 कोटी केली गेली. 2006 पासून 2017 पर्यंत काम काही झाले नाही, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या घोटाळ्यांची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागतील. मुंबई महापालिकेकडे पैशाची कमतरता नाही तर कमी आहे ती इच्छाशक्तीची. मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन आम्ही करणारच, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या