Advertisement

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी चौकशी समिती स्थापन


धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी चौकशी समिती स्थापन
SHARES

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मुंबईत मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या भरपाई प्रकरणाच्या चौकशीसाठी अखेर राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे. या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करावा असे आदेशही राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.


मंत्रालयात केलं होतं विष प्राशन

संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयात खेटे घालून कंटाळलेल्या धर्मा पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यानंतर त्यांना त्वरीत जे. जे. रूग्णालयात हलवण्यात आलं. पण काही दिवसांनी उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. धर्मा पाटील यांच्या निधनानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येसह जमीन संपादनातील भ्रष्टाचाराचा विषय एेरणीवर आला.


तीन महिन्यांत होणार अहवाल सादर

अखेर राज्य सरकारने आता धर्मा पाटील यांच्या जमीन संपादनाच्या भरभाईच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. माजी प्रधान जिल्हा न्यायाधीश शाम दर्णे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आंब्यांच्या रोपांची तपासणी, झाडांचे मूल्यांकन, भूसंपादन प्रक्रिया आणि धर्मा पाटील यांचे आत्महत्या प्रकरण अशा चार मुद्दयांवर चौकशी करणार आहे. पुढच्या तीन महिन्यांत ही समिती या मुद्द्यांचा अभ्यास करून आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे.



हेही वाचा

मंत्रालयाच्या दारात पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा