मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 2500 गॅसचे वितरण

दहिसर - दहिसर पूर्व आनंद नगर काशीमठ मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गॅस आणि झाडांचे वितरण करण्यात आले. यावेळी भाजपाचे अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त दहिसरच्या भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी 2500 गॅस आणि 1111 झाडांचे वितरण करण्यात आले. तसंच यावेळी पंतप्रधानांची उज्ज्वला योजना एक चित्रफीतीद्वारे नागरिकांना दाखवण्यात आली.

Loading Comments