व्यवस्थेचे भाग होऊ नका, व्यवस्था बदला - मुख्यमंत्री

 Dadar
व्यवस्थेचे भाग होऊ नका, व्यवस्था बदला - मुख्यमंत्री
Dadar , Mumbai  -  

दादर - मराठी दिनानिमित्‍त सोमवारी दादर पूर्व येथील वसंतस्‍मृती सभागृहात भाजपाच्‍या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेण्‍यात आली. या वेळी मराठी भाषेचा प्रभावी वापर आणि त्‍याबाबतची पुस्‍तके यावर मराठी भाषेचे अभ्‍यासक शरदमणी मराठे यांनी मार्गदर्शन केले.

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. तसेच "महापालिकेत निवडून आलेल्‍यांनी व्‍यवस्‍थेचे भाग होऊ नका. तर व्‍यवस्‍था बदलण्‍याचा प्रयत्‍न करा, आपल्याला नवीन पारदर्शी व्यवस्था तयार करायची आहे. ती केवळ भाषणात नव्हे तर अस्तित्वात देखील असली पाहिजे," असा सल्ला फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला.

भाजपाचे मुंबई अध्‍यक्ष आमदार आशिष शेलार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्‍यात आला. या वेळी मुख्‍यमंत्री म्‍हणाले की, "मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा असून आपल्यापैकी प्रत्येकाला मराठी भाषेचा अभिमान आहे. ज्या भाषेने विचार दिले ती भाषा 21 व्या शतकात तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे. जगभरात 12 कोटीपेक्षा अधिक लोक मराठी भाषा बोलतात याचा आपल्‍याला अभिमान आहे. या भाषेच्या आधारावर महाराष्ट्राचा विकास करूया," असे आवाहन मुख्‍यमंत्र्यांनी केले. तसेच भाजपाने मुंबईत दाखवून दिले. 31 जागांवरून 82 ला पोहोचलो. माध्यमे दाखवत आहेत की शिवसेना कशी कमी जागा हरली. पण आपला ग्राफ पहिला तर जनतेने मोठं समर्थन आपल्‍याला दिल आहे. भाजपाला 28.5% मत मिळाली आहेत.195 जागा लढवून आपण 82 जागा जिंकलो. भाजपाची अडीच तीन वर्षांची वाटचाल पाहिली तर कळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे बोलतात ते करून दाखवतात, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या वेळी संघटनमंत्री सुनिल कर्जतकर यांच्‍यासह मुंबईतील भाजपा आमदार अाणि पदधिकारी उपस्थित होते.

Loading Comments