'महापालिकेत भाजपालाच बहुमत'

  Mumbai
  'महापालिकेत भाजपालाच बहुमत'
  मुंबई  -  

  नरिमन पॉईंट - लोकसहभाग अधिक असेल तितका विकासाचं कार्य चांगल्या पद्धतीने होतं, म्हणून आपलं शहर आपला अजेंडा हा कार्यक्रम राबवत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पार्लमेंट ते पालिका एकच सरकार असावं असं मत मांडत पालिकेत भाजपालाच बहुमत मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. प्रथमच फेसबुक लाइव्हद्वारे मुख्यमंत्र्यांनी जनतेची सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संवाद साधला.

  या वेळी मुंबई खड्डा घोटाळा झाला असल्याचे मुख्यमंत्र्यानी मान्य केलं. निकृष्ठ दर्जामुळेचं मुंबईतल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. भाजपाला महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळणार, त्यामुळे शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

  पाण्याचा योग्य उपयोग करता यावा यासाठी आगामी काळात गृहनिर्माण संस्थामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू करणार असून पुर्नविकास इमारतीत झीरो डिस्चार्ज कार्यक्रम ही लवकर

  घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. औष्णिक विद्युत केंद्रामध्ये पिण्याचं पाणी वापरण्यावर बंदी घातली आहे. त्याप्रमाणे प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन बसेस रस्त्यावर आणणार आहे. तसंच वाहतूक सुरळीत करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यासाठी कायद्यांची अंमलबजावणी, कठोर कायदे तयार करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

  पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याच्या साठ्यांमध्ये जाणारं दूषित पाणी किंवा घाण पाणी रोखण्यासाठी भूमिगत गटार योजना, ट्रॅफिक किंवा प्रदूषण कमी करण्यासाठी शहरामध्ये सायकल ट्रॅक, सरकारी रुग्णालयामध्ये डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यात येणार आहे.
  महिलांसाठी शौचालयं तयार करणं हे महापालिकांसाठी बंधनकारक करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.