• 'महाराष्ट्र माझा'चे विजेते घोषित
  • 'महाराष्ट्र माझा'चे विजेते घोषित
  • 'महाराष्ट्र माझा'चे विजेते घोषित
  • 'महाराष्ट्र माझा'चे विजेते घोषित
SHARE

प्रभादेवी- माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा 2 ऑक्टोबर 2016 रोजी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्या छायाचित्रकारांना पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. हा समारंभ प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे कला अकादमी मुंबई येथे संपन्न झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित छायाचित्र स्पर्धेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. सुमारे 3,800 छायाचित्रांचा स्पर्धेत समावेश होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक पुण्याचे देवदत्त कशाळीकर यांना, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मुंबई दबंग दुनिया वृत्तपत्राचे छाया चित्रकार विद्याधर राणे यांना तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मुंबईच्या दैनिक पुढारीचे छायाचित्रकार दिनेश भडसाळे यांना देण्यात आले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या