मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिगत जलबोगद्याचं लोकार्पण

Bhandup
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिगत जलबोगद्याचं लोकार्पण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिगत जलबोगद्याचं लोकार्पण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिगत जलबोगद्याचं लोकार्पण
See all
मुंबई  -  

भांडूप - गुंदवली-कापुरबावडी-भांडुप कॉम्प्लेक्स या महत्वाकांक्षी जलबोगद्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आलं. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, युवासेना नेते आदीत्या ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या काळात असे अनेक प्रकल्प राबविण्यात अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हा प्रक्लप वेळेत पूर्ण करण्यासाठी घेण्यात आलेली मेहनत ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पालिकेचं कौतुक केलं. आम्ही भांडूपमध्ये येऊन विकासाची कामे करतो, तर येथील लोकप्रतिनिधी, इथले नेते तलवारी आणि बंदुका घेऊन लढत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक आणि संजय दिना पाटील यांच्यावर केली. मुंबई महापालिकेनं अनेक कामं, प्रकल्प पूूर्ण करून अनेक रेकॉर्ड प्रस्थापित कल्याचं यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.