ईसीबी मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत

  Pali Hill
  ईसीबी मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत
  मुंबई  -  

  मुंबई - आर्थिक दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेंतर्गत आर्थिक मागास वर्गाची (ईसीबी) उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून, वार्षिक सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या सर्वच प्रवर्गातील कुटुंबामधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत देण्यात येणार आहे. या योजनेमुळे आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोपे होणार आहे.

  गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.राज्यात निघत असलेल्या मराठा मोर्चांमध्ये शिक्षण परवडत नसल्याचा मुद्दा प्रकर्षाने मांडला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर 60 टक्के गुण असलेल्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजनेतून फी सवलत देण्यात येणार आहे. तसेच अल्पभूधारक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पंजाबराव देशमुख यांच्या नावाने, तर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने योजनांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रतिज्ञापत्रावरून न्यायालयाने सरकारला फटकारले नसून, याचिकाकर्त्यांनीच वेळ मागितल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

  मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • आर्थिक दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजनेची घोषणा
  • 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या सगळ्यांसाठी ही योजना लागू
  • फी प्रतिपूर्ती योजना आतापर्यंत फक्त खाजगी महाविद्यालयांसाठी होती. आता सरकारी - - महाविद्यालयांसाठीही फी प्रतिपूर्ती योजना लागू होणार
  • या योजनेनंतर 1 लाख 45 जागा विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील.
  • पंजाबराव देशमुख यांच्या नावे सुरू होणाऱ्या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना - व्यावसायिक शिक्षण घेताना निवासासाठी 30 हजार रुपये प्रतिवर्ष देण्यात येणार
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेतून आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण,
  • शिक्षणसाहित्य शासनाकडून उपलब्ध करण्यात येणार
  • 2.5 ते 6 लाख उत्पन्न असणाऱ्यांनी खासगी मेडिकल कॉलेजसाठी शैक्षणिक कर्ज घेतले तर व्याज राज्य सरकार भरणार
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.