'खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

 Vidhan Bhavan
'खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'
'खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'
See all

नरिमन पॉईंट - मराठा आरक्षणाबाबत सरकारनं कोर्टात वेळ मागितला, मात्र मुख्यमंत्री म्हणाले की वेळ मागितलेला नाही. कोर्टाच्या आदेशाच्या प्रतीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलत असल्याचं उघड होत आहे. कोर्ट ऑर्डरमध्ये सरकारला वेळ हवा आहे, असं स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

नारायण राणे यांनी मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्याना टार्गेट केलं. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असतं, तर सरकारनं नोव्हेंबर २०१४ पासून आजपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही? आपलं पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात मुख्यमंत्र्याविरोधात आम्ही अविश्वास ठराव आणणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तळेगाव अत्याचारानंतर उद्रेक झालेल्या नाशिकमधील अशांततेला पालकमंत्री गिरीश महाजनच जबाबदार असल्याचा दावा, राणेंनी केला. भाजपामध्ये गुंडाना प्रवेश दिला जातोय. मुख्यमंत्री १४ भ्रष्ट मंत्र्यासंह सरकार चालवत आहेत. एखाद्या मंत्र्यावर आरोप झाले की मुख्यमंत्री त्यांना क्लिन चीट देतात, असा आरोपही राणे यांनी केला.

Loading Comments