व्यापारी संघटनांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 Malabar Hill
व्यापारी संघटनांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
व्यापारी संघटनांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
व्यापारी संघटनांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
व्यापारी संघटनांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
See all

मलबार हिल - फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेयर्स असोसिएशन, आहार संघटना तसंच 40 संघटनांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं.

"पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटबंदीमुळे व्यापारी वर्गाला व्यवसायात मोठं नुकसान सहन करावं लागतंय. त्याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा," अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली. "प्राप्तिकर कमी करण्याबाबत तसंच सुट्ट्या पैश्यासाठी व्यापाऱ्यांना बँकेत वेगळ्या खिडकीची सोय करून द्यावी," अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरशी तात्काळ चर्चा करू, असं आश्वासन व्यापाऱ्यांना दिलं.

Loading Comments