समान निधी वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला पुन्हा आश्वासन

  Bandra west
  समान निधी वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला पुन्हा आश्वासन
  मुंबई  -  

  मातोश्रीवर शिवसेना आमदार आणि मंत्र्यासोबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बैठक घेतल्यानंतर विकास निधीबाबत विधान भवनात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, प्रतोद सुनील प्रभू, प्रकाश सुर्वे, अजय चौधरी, ग्रामीण भागातील आमदार शंभुराजे देसाई आणि राजेश क्षीरसागर उपस्थितीत होते. 

  या बैठकीत शिवेसेना आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात अपुरा विकास निधी मिळत असल्याची तक्रार केली. त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली. यावेळी शिवसेना आमदारांना भाजपा आमदारांसारखाच विकास निधी दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री यांच्यासोबत एकत्र बसून, बजेटमधून किती विकास निधी आमदारांना देता येईल, शिवसेना आणि भाजपा आमदारांमध्ये विकास निधीचे समान वाटप कसे करता येईल. तसेच याबाबत तोडगा काढण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. अर्थ मंत्री आणि अर्थ राज्यमंत्री यांनी, लवकरात लवकर सर्व नियोजन करून आराखडा सादर करावा. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या आमदारांना, समतोल विकास निधीचे वाटप करता येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.