मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर शिवसेना मवाळ


  • मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर शिवसेना मवाळ
SHARE

मुंबई - शुक्रवारी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्त्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री अरुण जेटली आणि कृषीमंत्री यांच्याशी कर्जमाफीबाबत चर्चा केल्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देताना स्पष्ट केले की केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण झाल्यानंतर शिवसेनेने आपली भूमिका मवाळ केली. शिवसेनेचे आमदार विजय औटी याबाबत म्हणाले की कर्जमुक्ती संदर्भात निवेदन देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कर्जमुक्तीसाठी सरकार राज्याचा खर्च उचलायला तयार आहे. शेतकऱ्यांना फायदा पोहचविण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. तसेच राज्य सरकार आपली जबाबदारी उचलायला तयार आहे. त्यामुळे शिवसेनेने आपला विरोध मागे घेऊन विधिमंडळात अर्थसंकल्प मांडायला विरोध करणार नाही अशी भूमिका घेतली. 

मात्र या भूमिकेवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेचे दुटप्पी धोरण आहे. कालपर्यंत शिवसेना म्हणत होती अर्थसंकल्प मांडू देणार नाही, आज असे काय झाले की शिवसेनेचा वाघ शांत झाला? सत्तेत राहायचे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राजकारण करायचे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या