डंपिंग ग्राऊण्ड शिवसेनेमुळेच सुरु - सीएम

 Mulund
डंपिंग ग्राऊण्ड शिवसेनेमुळेच सुरु - सीएम

मुलुंड - पुन्हा एकदा पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. बुधवारी मुलुंडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. 'मी कलगी- तुऱ्यासाठी आलेलो नसल्याचे त्यांनी सांगत शिवसेनेवर हल्लाबोल केला.

केंद्राच्या अहवालानुसार मुंबई महापालिका कशाप्रकारे तिसऱ्या स्थानावर आहे, हे सागंताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर आणि मुंबई महापालिकेतील कारभारावर जोरदार टीका केली. केंद्राच्या अहवालाचा शिवेसेने विपर्यास करुन लोकांची दिशाभूल केली आहे. देशात हैदराबाद महापालिका पहिल्या क्रमांकावर आहे. बंगळुरु महापालिका दुसऱ्या क्रमांकावर, तर मुंबई महापालिका तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगत केंद्राच्या अहवालावरून स्वतःची पाठ थोपटणाऱ्या शिवसेनेवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. तसेच टेंडरच्या बाबतीत केंद्राने जर मूल्यमापन केले असते तर मुंबईची मोठी बदनामी झाली असती असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. तसेच डम्पिंग ग्राउंड शिवसेनेमुळेच अद्याप चालू असल्याचं म्हणत शिवसेनेवर त्यांनी तोफ डागली.

Loading Comments