निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, पण स्वबळाचीही तयारी

दादर - महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करायची की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील. पण वेळ आलीच तर आमची स्वबळाचीही तयारी आहे, अशी स्पष्टोक्ती मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. उंगली उठाव मोहिमेंतर्गत ‘मुंबई लाइव्ह’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. महानगरपालिकेतल्या घोटाळ्यांवरून शिवसेनेला भाजपाकडून टार्गेट केलं जातंय, या आरोपात तथ्य नसल्याचंही ते म्हणाले. महापालिकेत घोटाळे होत होते पण आघाडी सरकारच्या कारकीर्दीत त्यावर कारवाई होत नव्हती. आता मुख्यमंत्री सक्षम असल्यानं घोटाळ्यांवर लगेच कारवाई होते आणि त्यामुळे आम्ही शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करतो, असा आरोप होतो असं शेलार म्हणाले.

Loading Comments