Advertisement

'यांच्या घोटाळ्याबाबत आता सविस्तर बोलेन', मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा


'यांच्या घोटाळ्याबाबत आता सविस्तर बोलेन', मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा
SHARES

'यांच्या घोटाळ्यांबाबत अजून बोललो नव्हतो आता सभागृहात सविस्तर बोलेन' असा धमकी वजा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दिला. आघाडी सरकारच्या काळात गाजलेल्या सिंचन घोटाळ्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि विरोधकांना सुनावलं. तसंच जल सिंचनावर 4 एफआयआर दाखल झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.


'हल्ला बोल करणाऱ्यांचे डल्ला मारचे पुरावे समोर येतील'

सध्या सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चागलीच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. सरकार 3 वर्षांत शेतकरी तसेच सर्वसामान्यांना कसं फसवत आहे ते दाखव्यासाठी राष्ट्रवादीकडून विविध ठिकाणी हल्ला बोल आंदोलन काढलं जात आहे. या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'जे आता हल्ला बोल करत आहेत, त्यांच्या डल्ला मारचे पुरावे आता समोर येतील, असा इशाराचा मुख्यमंत्र्यांनी दिला.


आमच्याकडे मसाला आहे, असे हे सरकार गेली 3 वर्ष सांगत आहेत. त्यामुळे आता त्यांनी धमकी देणं बंद करावं.

- धंनजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

संबंधित विषय
Advertisement