Advertisement

मुख्यमंत्री ७ मार्चला करणार अयोध्या दौरा

मुख्यमंत्री ​उद्धव ठाकरे​​​ (Cm uddhav thackeray) येत्या ७ मार्चला अयोध्येला (ayodhya visit) जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांनी ट्विट करून दिली.

मुख्यमंत्री ७ मार्चला करणार अयोध्या दौरा
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) येत्या ७ मार्चला अयोध्येला (ayodhya visit) जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांनी ट्विट करून दिली. या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहनही राऊत यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना केलं आहे. 

हेही वाचा- हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या, फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान

तब्बल ९ महिन्यांनंतर उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) पुन्हा एकदा अयोध्येला (ayodhya visit) जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर (ram mandir) प्रकरणावर निर्णय दिल्यावर अयोध्येचा दौरा करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आल्यामुळे घोषणेनुसार मुख्यमंत्र्यांना २४ नोव्हेंबर २०१९ रोजी अयोध्येचा दौरा करता आला नाही.

 

त्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली हाेती. या घोषणे नुसार आता या अयोध्या दौऱ्याचं आयोजन करण्यात येत आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतील, त्याचप्रमाणे ते शरयू नदीतीरावर आरती करतील, अशी माहितीही संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात सत्तास्थापना झाल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपकडून (bjp) प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. आता काही लोकं अयोध्येला जायला निघाले आहेत. जरूर जा. ज्यासाठी आपण रक्ताचं बलिदान दिलं, तिथे जाऊन प्रभू श्रीरामांचं दिर्शन घेऊन कदाचित तुमच्या रक्तातलं हिंदुत्व उफाळून येईल आणि हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्यांना तुम्ही पाठिशी घालणार नाही. प्रभू श्रीराम तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण तुम्हाला होईल, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

हेही वाचा- ‘एनआरसी’साठी मंत्र्यांची समिती नेमणार- मुख्यमंत्री 

याआधी जून २०१९ मध्ये उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांनी अयोध्येचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर विधीवत पूजा देखील केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत १८ खासदार देखील अयोध्येला गेले होते. महाराष्ट्रात शिवसेना (shiv sena) आणि भाजपाची (bjp) युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच अयोध्या यात्रा असणार आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळातील सर्वांचंच लक्ष लागलं आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा