मुख्यमंत्र्यांना 'पुणेरी टोमणे', सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस

 Mumbai
मुख्यमंत्र्यांना 'पुणेरी टोमणे', सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील सभा गर्दी अभावी रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सदाशिव पेठेत टिळक रोडवर आयोजित केली होती. भर दुपारच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवली. समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले. मात्र सोशल साईट्सवर विनोदांचा पाऊस सुरु झाला. दुपारच्या वेळेत तेही सदाशिव पेठेत मुख्यमंत्र्यांनी सभा आयोजित करणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण असल्याचे मेसेज पुण्यात फॉरवर्ड होऊ लागले.

पुणेकरांची 1 ते 4 ही वेळ झोपण्यासाठीच असते, त्या वेळेत सर्व व्यवहार बंद असतात, असे मेसेज यापूर्वीचेच आहेत. मात्र तरीही त्यावेळेत सभा आयोजित केल्याने, मुख्यमंत्र्यांना पुणेरी टोमण्यांना सामोरं जावं लागत आहे.

Loading Comments