Advertisement

भाजप सरकारच्या काळातील ३३ कोटी वृक्ष लागवडीची होणार चौकशी

भाजप सरकारच्या काळात राज्यात राबविण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी विधानसभेच्या १६ सदस्यांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत केली.

भाजप सरकारच्या काळातील ३३ कोटी वृक्ष लागवडीची होणार चौकशी
SHARES

भाजप (bjp) सरकारच्या काळात राज्यात राबविण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी विधानसभेच्या १६ सदस्यांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत केली. ही समिती ४ महिन्यात सभागृहाला अहवाल सादर करेल, असंही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्याची मागणी केली होती. या योजनेसाठी शासकीय तिजोरीतून निधी खर्च करण्यात आला आणि खासगी लोकांनीही निधी वाटप करण्यात आला. या मोहिमेसाठी रोपे कुठून आणली, ती किती रुपयांना पडली, त्यापैकी किती वृक्ष आज उभे आहेत, या योजनेत भ्रष्टाचार झाला का, आदी प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले होते. 

तसंच सदस्य रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विधिमंडळाच्या समितीमार्फत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्यात येईल. ४ किंवा ६ महिन्यात याचा अहवाल सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिली होती. त्यानुसार वने राज्यमंत्र्यांनी समितीची घोषणा केली.

हेही वाचा- बीएमसी प्रभागांच्या आरक्षणात १० वर्षांनी होणार बदल

चौकशीची घोषणा केल्यावर ही चौकशी कधी होणार, अहवाल कधी मांडणार, असे प्रश्न सुधीर मुनगंटीवार (sudhir munfantiwar) यांनी विचारले. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी समिती नियुक्ती ३१ मार्चपर्यंत होईल आणि कामकाजासाठी जास्तीत जास्त ६ महिन्यांचा कालावधी दिला जाईल, असं स्पष्ट केलं.

या वेळी चर्चेला उत्तर देताना वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी, राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम राबविण्याकरिता २०१६-१७ ते २०१९-२० या कालावधीत वन विभागाला दोन हजार ४२९ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तो पूर्णपणे वापरण्यात आला आहे.

या मोहिमेअंतर्गत वन विभागाकडून २८ कोटी २७ लाख वृक्ष लागवड करण्यात आली. त्यातील ७५.६३ टक्के रोपे ऑक्टोबर २०२० अखेर जिवंत असून त्यांची देखभाल करण्यात येत आहे. हे वृक्ष जगले पाहिजेत, यासाठी शासन कुठलेही निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी माहिती दिली.

वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधानसभा सदस्य नाना पटोले, सुनील प्रभू, उदयसिंग राजपूत, बालाजी कल्याणकर, अशोक पवार, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, शेखर निकम, सुभाष धोटे, अमित झनक, संग्राम थोपटे, आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातखळकर, समीर कुणावर आणि नरेंद्र भोंडेकर यांचा समावेश आहे.

(committee appointed for inquiry of 33 crore tree plantation movement in maharashtra during bjp government)

हेही वाचा- सचिन वाझे यांची तात्काळ बदली, गृहमंत्र्यांची घोषणा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा