Advertisement

परिचारकांच्या निलंबनावरून तिसऱ्या दिवशीही गोंधळ


परिचारकांच्या निलंबनावरून तिसऱ्या दिवशीही गोंधळ
SHARES

मुंबई - विधान परिषदेमध्ये बुधवारीही भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी मिळून विधान परिषदेत या मुद्द्यावरून राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज बुधवारी ठप्प झाले. 

आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर कारवाई व्हावी याबाबत दुमत नाहीचौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत प्रशांत परिचारक यांना निलंबित करण्यात येणार आहे. तशी शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात येईल, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 

“प्रशांत परिचारक यांच्यावरील कारवाईबाबत सात सदस्यांची सर्वपक्षीय समिती नेमण्याची विनंती सभागृहाला केली आहे. त्या समितीचा अहवाल येईपर्यंत परिचारकांना निलंबित केलं जाईल. परिचारकांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्यानंतर समिती जो निर्णय घेईल, तो सरकारला मान्य असेल. तो आम्ही सभागृहात मांडू. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी समितीचा अहवाल येईल. तोवर परिचारक यांना निलंबित करण्यात येईल. गुरुवारी विधानपरिषदेत तसा ठराव मांडू”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले..



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा