प्रचारासाठी पथनाट्याचा वापर

  Mulund
  प्रचारासाठी पथनाट्याचा वापर
  मुंबई  -  

  मुलुंड - मुंबईसह अनेक शहरात महानगरपालिका निवडणुका आता चांगल्याच रंगत आहेत. सर्व पक्ष नवनवीन कल्पना राबवत प्रचार करत आहेत. शुक्रवारी मुलुंड चेक नाक्याजवळील किसननगर येथे एका पथनाट्यामार्फत काँग्रेस पक्षाचा प्रचार करण्यात आला. मुलुंडमधील व्ही.जी.वझे महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांनी या पथनाट्याचे सादरीकरण केले. मतदानाबद्दल जनतेमध्ये जनजागृती व्हावी तसेच सर्व मतदारांनी मतदानास हजेरी लावावी या उद्देशाने या पथनाट्याचे आयोजन केले होते. प्रचार करण्यासाठी राजकीय पक्ष नवनवीन युक्त्या लढवत असतातच परंतु आता समाज प्रबोधनासाठी केल्या जाणाऱ्या पथनाट्याची देखील त्यात भर पडली आहे हे नवलच !

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.