• नेत्यांचं इनकमिंग-आऊटगोईंग सुरू
  • नेत्यांचं इनकमिंग-आऊटगोईंग सुरू
SHARE

दादर -  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काही नेत्यांनी सोमवारी दादर येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी पालघर जिल्ह्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी, भाजपा, श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा माजीमंत्री राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवराम गिरंधर, भाजपाचे आदिवासी विभागाचे तालुकाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या