Advertisement

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक


निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक
SHARES
Advertisement

दादर - टिळकभवन कार्यालयामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका घेण्यात आल्या. या बैठकीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे, हुसैन दलवाई, भाई जगताप हजर होते.

जिल्हा पातळीवर आघाडी करायची की नाही? यावर बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. या वेळी अशोक चव्हाण यांनी नोटाबंदीवर टीका केली. नवीन वर्षामध्ये सामान्य लोकांना रांगांमध्ये उभं राहावं लागणार आहे. याविरोधात जानेवारीत देशभरात आंदोलन करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. तसंच ओबीसी मंत्रालय हे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सोयीसाठी बनवलं की काय? असा प्रश्नही अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

संबंधित विषय
Advertisement