मोदी सूटप्रकरणी फिर्यादींकडून संरक्षणाची मागणी

 Fort
मोदी सूटप्रकरणी फिर्यादींकडून संरक्षणाची मागणी

सीएसटी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित सूट 4 कोटी 31 लाखांचा आहे. ज्या कंपनीनं तो विकत घेतला, त्यांच्यावर महानगर न्यायालयात खटला दाखल आहे. या प्रकरणात फिर्यादींना संरक्षण आणि न्याय मिळावा, अशी मागणी युनायटेड काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लालजीभाई पटेल यांनी हा सूट विकत घेण्यासाठी पैसे गुंतवले होते. पण फसवणूक झाल्याचं लक्षात येताच ते बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेले. मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. उलट भाजपाचे कांदिवली येथील आमदार योगेश सागर यांनी फोन करून धमकावलं की, आमच्याविरोधात तक्रार करणं म्हणजे मोदींजींविरोधात तक्रार करण्यासारखं आहे. त्यामुळे फिर्यादी घाबरून मुंबई सोडून निघून गेले. आता आमच्या पार्टीतर्फे संबंधितांवर 420, 403, 405, 406, 415, 418, 114, 120-B अन्वये खटला दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणात फिर्यादींना संरक्षण आणि न्याय मिळावा, असं शुक्ला यांनी म्हटलं आहे.

Loading Comments