Advertisement

'काँग्रेस मुक्त' अभियानाला सुरुवात


'काँग्रेस मुक्त' अभियानाला सुरुवात
SHARES

घाटकोपर - काँग्रेस पक्षाने गोरगरिबांसाठी कधीच कामे केली नसल्याची टीका महाराष्ट्र मुक्त अभियानाचे अध्यक्ष विलास रुपवते यांनी केलीय. तसंच 'महाराष्ट्र मुक्ती काँग्रेस अभियान' याची सुरुवात शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता करण्यात आली. तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं.

'काँग्रेस हा गोरगरिबांचा पक्ष मानला जातो, पण असे नसून या पक्षात नेहमीच गरिबांची पिळवणूक केली आहे, गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या हाती सत्ता असून देखील गरीब जनतेसाठी कोणतेचे काम केले नाही. त्यामुळे आता सर्व गरीब नागरिक एकत्र आले. काँग्रेस पक्ष इतर पक्षासारखे नेहमी निवडणुकीच्या काळात जातीचे राजकारण करते. तसेच काँग्रेसमुक्त अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येणार असल्याचेही महाराष्ट्र मुक्त अभियानाचे अध्यक्ष रुपवते यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement