Advertisement

काँग्रेस नेते मिलिंद देवरांचं सोनियांना ‘या’ कारणासाठी पत्र..

काँग्रेस नेते मिलिंद देवरा (milind deora) यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना पत्र लिहिलं आहे.

काँग्रेस नेते मिलिंद देवरांचं सोनियांना ‘या’ कारणासाठी पत्र..
SHARES

काँग्रेस नेते मिलिंद देवरा (milind deora) यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून देवरा यांनी महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, त्यासाठी एक समिती नेमावी, अशी मागणी केली आहे. 

हेही वाचा- अशोक चव्हाण चुकीचं बोलले- नवाब मलिक

शिवसेना (shiv sena), राष्ट्रवादी (ncp) आणि काँग्रेसचं (congress) महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन ५० दिवस उलटून गेले आहेत. या दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या पक्षाचा अजेंडा पुढं घेऊन जाताना दिसत आहे. निवडणुकीत मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत. मार्च २०१९ मध्ये राहुल गांधी (rahul gandhi) यांनी मुंबईत भाषण करताना गरिबांना ५०० चौ. फुटांचं घर देण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाचा किमान समान कार्यक्रमातही (common minimum programme) समावेश करण्यात आला आहे. तेव्हा काँग्रेसने देखील या आश्वासनांसोबतच निवडणुकीत दिलेल्या इतर आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही एक समिती नेमावी, अशी मागणी देवरा यांनी केली आहे.  

हेही वाचा- 'मुंबईत दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत मुख्यमंत्र्यांची भेट, मग ऊत येणारच…'

मिलिंद देवरा हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे देवरा यांच्या मागणीवर सोनिया गांधी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा