Advertisement

राणेंच्या ऐतिहासिक घोषणेला अखेर मुहूर्त मिळाला!


राणेंच्या ऐतिहासिक घोषणेला अखेर मुहूर्त मिळाला!
SHARES

काँग्रेसमध्ये नाराज असलेले नारायण राणे भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. मात्र आता 21 सप्टेंबरला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी भविष्यातली दिशा स्पष्ट करणार असल्याची घोषणा खुद्द काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी सिंधुदूर्गमध्ये केली आहे.



त्यांना राणे अजून कळला नाही 

भाषणादरम्यान राणेंनी पक्षातली आपली नाराजी जाहीर केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना राणे अजून कळला नसल्याचं म्हटलं. ''राणेंना डिवचलं की त्यांना दुप्पट ताकद येते, हे त्यांना माहीत नाही. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. मात्र मी आहे तिथेच आहे. डिवचणारे मात्र दिसत नाहीत.'', असं म्हणत राणेंनी काँग्रेसवर प्रहार केला.


काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्याचं कारण समजलं नाही. काँग्रेसच्या एकाही नेत्यानं मला विचारलं नाही. कोणाचीही इतकी हिंमत झाली नाही. मी काँग्रेसचा नेता आहे. कोणालाही कोणतीही नोटीस न देता कार्यकारणी बरखास्त केली गेली. “तुम्ही नियमबाह्य निर्णय घेतल्यामुळे आमची पदे शाबूत आहेत. कारण तुमचा निर्णय नियमबाह्य आहे.
- नारायण राणे, काँग्रेस आमदार



हेही वाचा -

'ती' दिवसभर हेल्मेट घालून का फिरते? वाचा...



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा