Advertisement

विमान प्रवाशांचे पैसे परत करा, पृथ्वीराज चव्हाण यांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र

विमान प्रवाशांच्या तिकीटाचे सर्व पैसे त्यांना मिळावेत या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांना पत्र लिहिलं आहे.

विमान प्रवाशांचे पैसे परत करा, पृथ्वीराज चव्हाण यांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र
SHARES

लाॅकडाऊनच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तातडीने बंद करण्यात आल्या. परिणामी विमान कंपन्यांनाही सर्व उड्डाणं रद्द करावी लागली. प्रवाशांनीही परिस्थितीचं भान राखत आपापली विमान तिकीटं रद्द केली. परंतु रद्द करण्यात आलेल्या तिकीटांचे पैसे मात्र अद्याप त्यांना मिळालेले नाही. या समस्येकडे लक्ष वेधत विमान प्रवाशांच्या तिकीटाचे सर्व पैसे त्यांना मिळावेत (congress leader prithviraj chavan wrote a letter to civil aviation minister for cancel flight ticket refund of passengers) या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांना पत्र लिहिलं आहे. 

आपल्या पत्रात ते म्हणतात की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या अभूतपूर्व लाॅकडाऊनमुळे विमान कंपन्यांनाही जगभरात ४.५ दशलक्ष फ्लाइट्स अचानक रद्द करावी लागली. देशात देखील लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर विमान प्रवाशांनी ताबडतोब आपली तिकीटं रद्द केली. त्यानुसार सर्व विमान प्रवाशांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळायला हवे होते. याबाबत ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सर्व विमान कंपन्यांसोबत करार करण्यात आलेला आहे. 

हेही वाचा- प्रत्येक गरीब कुटुंबाच्या खात्यात १० हजार रोख जमा करा- पृथ्वीराज चव्हाण

परंतु या कराराचं उल्लंघन करत एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीसहीत इतर सर्व विमान कंपन्यांनी विमान प्रवाशांना तिकीटाचे पूर्ण पैसे न देता भविष्यातील प्रवासाचे व्हाऊचर्स देऊ केलेत. तिकीटाची रक्कम मिळण्याचे इतर पर्याय देण्याऐवजी विमान कंपन्यांनी प्रवाशांना हे व्हाऊचर्स बळजबरीने थोपवले. परंतु सगळ्याच प्रवाशांना भविष्यातील प्रवासाचे व्हाऊचर्स नको आहेत, त्यांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासंदर्भात मुंबई ग्राहक पंचायत या संस्थेने पुढाकार घेत संयुक्त राष्ट्राच्या दिशानिर्देशांकडे लक्ष वेधलं आहे, अशी माहितीही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान विमान तिकिटे रद्द झालेल्या प्रवाश्यांना विमान कंपन्यांनी ठराविक कालावधीत त्यांच्या तिकिटाचे पैसे परत केले पाहिजेत. नागरी विमान मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी विमान कंपन्यांना प्रवाश्यांच्या तिकिटाचे पैसे परत करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करणार पत्र लिहिल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा