Advertisement

तरीही फडवणीस तुमचं तिकीट कापतील, सोमय्यांना इशारा

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि राजीव सातव यांनी चांगलंच घेरलं.

तरीही फडवणीस तुमचं तिकीट कापतील, सोमय्यांना इशारा
SHARES

विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ येत असताना भाजप महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीय. त्याला महाविकास आघाडीत सामील पक्षांच्या नेत्यांकडूनही तितक्याच जोरदारपणे उत्तर दिलं जात आहे. अशाच एका ट्विटवर उत्तर देताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि राजीव सातव यांनी चांगलंच घेरलं. 

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत आघाडी करणाऱ्या शिवसेनेवर टीका केली होती. अजित पवार-शरद पवार यांनी कुणी कुणाला ‘मामू’ बनवलं माहीत नाही. परंतु शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला ‘मामू’ बनवलं हे नक्की, अशा शब्दांत टीका केली होती. 

तसंच शिवसेनेनं विधानसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या नावाने लढवली. काँग्रेस-राष्ट्रवादीने युतीच्या विरोधात निवडणूक लढवली. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, तर अजित पवारांना विचारा. म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणतात की पुन्हा विधानसभा निवडणुका घ्या. असं ट्विट सोमय्यांनी केलं होतं.    

त्यावर उत्तर देताना सचिन सावंत म्हणाले की, किरीट सोमय्याजी तुम्ही काय लिहिले आहे व त्याचा अर्थ का? हे तुम्हालाच ठाऊक पण अजित पवारांनी भाजपला व फडणवीस साहेबांना ‘मामू’ बनवलं हे मात्र निश्चित. ‘मामू’ म्हणजे मुख्यमंत्री बरं! तुमच्या मनातील दुसरा अर्थ माझ्या मनात नाही. 

तर, सोमय्या यांना उत्तर देताना राजीव सातव यांनी, “किरीटजी, इतकं ट्विट करूनही देवेंद्रजी पुढच्याही निवडणुकीत तुमचं तिकीट कापणार नाहीत, असं समजू नका! हवं तर तावडे, पुरोहित, बावनकुळे आणि खडसे यांना सविस्तर विचारून घ्या!!,” असं म्हणत कोपरखळी मारली. 

‘हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा’, असं खुलं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. त्यावर प्रतिउत्तर देताना आम्हाला सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसंही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा