दिंडोशीत काँग्रेसला झटका

 Kalanagar
दिंडोशीत काँग्रेसला झटका
Kalanagar, Mumbai  -  

दिंडोशी - महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर आलेली असतानाच दिंडोशी विधानसभा क्षेत्रात मागील चारवेळा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आलेले काँग्रेसचे भोमसिंग राठोड यांनी कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे शिवसेनेला आगामी पालिका निवडणुकीत ताकद मिळण्याची चिन्हे आहेत. या वेळी सातही जागेवर निवडून येऊ असं आश्वासन गजानन कीर्तीकर यांनी कार्यकर्त्यांना दिलं

राठोड यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं. शाखा भेटीचा दौरा दिवाळीनिमित्त थांबवण्यात आला असला तरी तो दौरा आता नव्यानं सुरू करणार असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

Loading Comments