Advertisement

एसबीआयच्या मुख्यालयावर काँग्रेस आमदारांचा मोर्चा


एसबीआयच्या मुख्यालयावर काँग्रेस आमदारांचा मोर्चा
SHARES

सीएसटी - विधीमंडळात शेतकरी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी थेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयावर मोर्चा नेला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी बुधवारी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू नये, असे वक्तव्य केले होते. त्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली.

विधी मंडळात याबाबत पडसाद उमटल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एसबीआय मुख्य कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले. अरुंधती भट्टाचार्य यांनी माफी मागावी नाहीतर त्यांच्याविरोधात हक्कभंग आणला जाईल, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला. काँग्रेसच्या आमदारांनी एसबीआयच्या ऑफीसमध्ये घुसण्याचा प्रयत्नही केला. मात्र पोलिसांचा बंदोबस्त वाढवला असल्याने एसबीआय कार्यालयामध्ये जाण्याचा प्रयत्न फसला. 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, "अरुंधती भट्टाचार्य यांनी विधान करण्यापूर्वी राज्यघटनेच्या निर्देशक तत्वांचा अभ्यास केला असता तर बरे झाले असते. घटनेनुसार दुर्बल घटकांना मदत करणे गरजेचं आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा