Advertisement

मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांनी एप्रिल फुल केलं - राधाकृष्ण विखे पाटील


मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांनी एप्रिल फुल केलं - राधाकृष्ण विखे पाटील
SHARES

नरिमन पॉईंट - सोमवारपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ए - 6 बंगल्यावर विरोधीपक्षातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी कर्जमाफी, शेतक-यांची आत्महत्या, परिचारक यांचे वादग्रस्त वक्तव्य यावर टीकेची झोड उठवली.

"शिवसेना आणि भाजपा दोन्ही कौरव आहेत आणि त्यांनी अधर्मासाठी सत्तेचा वापर केला आहे. तसेच राज्य सरकारचा जनतेला मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांनी एप्रिल फुल केलं आहे," अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे शिवसेनेने नाटक सुरू केले होते. शिवसेनेला मुंबई महापालिकेमध्ये रस आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे शेतकरी कधीच शिवसेनेला माफ करणार नाही, असा आरोप त्यांनी शिवसेनेवर केलाय.

"मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे खोदा पहाड निकला चुहा अशी परिस्थिती भाजपाची झाली आहे. जलयुक्त शिवारमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याविरोधात अधिवेशनामध्ये वाचा फोडणार आहे, असा इशारा विधानपरिषदेचे विरिधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. भाजपाला सत्तेची मस्ती चढली आहे, असाही आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांंच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले

राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी कर्जमाफी देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमाफीबाबत घोषणा व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रविवारी राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा शेतक-यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा