वाढती महागाई, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी इ. मुद्द्यांवर सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी मंत्रालयाबाहेर काळे कंदील लावण्याचा प्रयत्न केला. मात्र गस्तीवरील पोलिसांनी त्यांना वेळीच अडवत काही काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
विरोधकांनी विविध मुद्यावर सरकारला कायमच धारेवर धरलं आहे. नवनवी आश्वासने देऊन सत्तेत आल्यानंतर सरकारला आपल्या आश्वासनाचा विसर पडला. वाढती महागाई, इंधनदरातील वाढ, शेतकरी आत्महत्या, लोडशेडिंग इत्यादींमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली असल्याचं सांगत, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर काळे कंदील लावून सरकारचा निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवत त्यांच्याजवळील कंदील काढून घेतलं.
प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वीच पोलिसांनी काँग्रेसच्या ६८ कार्यर्त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस अधिक तपास करत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा-
मुंबईकरांनो, फटाके 'या' वेळेतच उडवा, नाहीतर खावी लागेल तरूंगाची हवा