Advertisement

मालाडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी


मालाडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
SHARES

मालाड - गेली कित्येक वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत असूनही ऐन महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळत नसल्याने अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच उमेदवारी मिळणार नसल्यामुळे मालाडमधील काँग्रेस नगरसेवक परमिंदर भामरा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर उमेदवारी मिळणार नसल्याचे कळताच काही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचा सूर उमटला आहे. यात मढच्या संगीता कोळी आणि ओमजी कुमावत यांचा समावेश आहे. मालाड मढमधील स्थानिक काँग्रेस महिला कार्यकर्त्या संगीता कोळी यांचे नाव आधी उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र फेमिदा शेख या नवीन महिला कार्यकर्त्या उमेदवाराच्या नावाची चर्चा रंगू लागलीय. त्यात वॉर्ड क्रमांक 33 चे ओमजी कुमावत यांचादेखील उमेदवारीचा पत्ता कट होणार असल्याचे कळते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून गळती अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा