Advertisement

व्यंगचित्रातून नितेश म्हणाले 'आता वाजले की बारा'!


व्यंगचित्रातून नितेश म्हणाले 'आता वाजले की बारा'!
SHARES

ठाकरे आणि राणे हा वाद काही महाराष्ट्राला नवा नाही. राणे पिता-पुत्र हे नेहमीच शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विविध माध्यमातून तोंडसुख घेत असतात. मात्र व्यंगचित्र काढण्याची आवड असणारे राणे पुत्र आमदार नितेश राणे यांनी व्यंगचित्रातून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


काय केली नितेश यांनी व्यंगचित्रातून टीका?

सध्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनीही राणेंच्या मंत्रीपदाचे संकेत दिल्याने शिवसेनेच्या पोटात गोळा आला आहे.

याच पार्श्वभूमीवर व्यंगचित्राच्या माध्यमातून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. विशेष म्हणजे नितेश राणे यांनी ते व्यंगचित्र आपलं व्हॉट्सअॅप स्टेट्स म्हणूनही ठेवलं आहे. नारायण राणे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीमुळे उद्धव ठाकरेंची झोप उडाली अशा आशयाचे हे व्यंगचित्र आहे.



व्यंगचित्र ट्विटरवर केले शेअर

नितेश राणे यांनी या व्यंगचित्राला 'वाजले की बारा' असे नाव देखील दिले आहे. व्हॉट्सअप स्टेट्ससोबतच नितेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरदेखील हे व्यंगचिंत्र शेअर केलं आहे.

दरम्यान नितेश राणे यांनी मुंबई लाईव्हला प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'ही टीका नसून आताची जी राजकीय परिस्थिती आहे, ती मी व्यंगचित्रातून रेखाटली आहे'. तसेच 'राणे साहेब सरकारमध्ये येत असल्याने उद्धव ठाकरे यांची कशी झोप उडाली आहे हे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे'.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा