Advertisement

मुलुंडमध्ये भाजपाविरोधात काँग्रेस रस्त्यावर


मुलुंडमध्ये भाजपाविरोधात काँग्रेस रस्त्यावर
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारच्या 3 वर्षांच्या कार्यकाळाचा निषेध करण्यासाठी मुलुंडमध्ये काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. येथील मेहुल टॉकीज परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने केली. 23 मे रोजी केंद्रातील भाजपा सरकारला 3 वर्षं पूर्ण होत असून, त्यानिमित्त नियोजित आनंदोत्सवाच्या संकल्पनेचा मुलुंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. 'केवळ प्रचार यंत्रणेचा वापर करत अपयशी कारकीर्द लपवण्याचा या हुकुमशाही सरकारचा हा प्रयत्न आहे,' असा आरोप काँग्रेसचे ईशान्य मुंबई सरचिटणीस राजेश इंगळे यांनी केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचे अपयश दर्शवणारे आणि अपूर्ण आश्वासने मांडणारे फलक झळकावले. 'दलितांवरचे वाढते अत्याचार, नोटबंदी, काळा पैसा तसेच अच्छे दिन' अशी सरकारने दिलेली अनेक आश्वासने हवेतच विरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा