• दोन माजी मुख्यमंत्री पोलिसांच्या व्हॅनमध्ये
SHARE

मुंबई - 15 वर्ष राज्यात सत्तेत असलेले पोलिसांच्या व्हॅन मध्ये आणि त्यात महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री. ऐकायला कसं वाटतं? विश्वास बसत नसेल ना? पण हे घडलंय आणि तेही मुंबईत. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांसह चक्क दोन माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि अशोक चव्हाणसुद्धा पोलीस व्हॅनमध्ये पहायला मिळाले. निमित्त होतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर काढलेल्या मोर्चाचे. काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकार आणि आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या राणे, चव्हाण, हर्षवर्धन पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आदींना पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही मिनिटांपुरतं ताब्यात घेतलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या