'नोटाबंदी हा इतिहासातील मोठा घोटाळा'

  Pali Hill
  'नोटाबंदी हा इतिहासातील मोठा घोटाळा'
  मुंबई  -  

  सीएसटी - नोटाबंदीच्या निर्णयावरून काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केले आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला 70 दिवस झाले आहेत. तरीही बँक खात्यातून पैसे काढण्यावरील निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले नाहीत, अशी टीका काँग्रेस कमिटीचे माध्यम प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. तसेच नोटाबंदीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी सप्टेंबर महिन्यात विविध बँकांमध्ये 3 लाख 20 हजार कोटींचे फिक्स्ड डिपॉजीट जमा झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणी पैसे डिपॉजीट केले? हे कोणाचे पैसे आहेत? काळे आहेत की पांढरे आहेत ? याची चौकशी सरकार का करत नाही? त्यामुळे नोटाबंदी हा इतिहासताला सर्वात मोठा घोटाळा असून सरकारने श्वेतपत्रिका काढावी आणि जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली आहे.

  गांधीभवनमध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे, माजी आमदार उल्हास पवार हे उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.