SHARE

सीएसटी - काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मनीष तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केलीय. महापालिका निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावले जात आहेत. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय महापौर बनणार आहेत का? प्रत्येक राज्यात नरेंद्र मोदी महापौर आणि मुख्यमंत्री बनणार आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपाने 31 महिन्यांच्या कालावधीत कुठला प्रकल्प आणला होता ते दाखवा. फक्त काँग्रेसने आणलेले प्रकल्प स्वत:च्या नावावर खपवण्याचे काम केले, असा आरोपही तिवारी यांनी केला.

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपमही उपस्थित होते. शिवसेना आणि भाजपामधील आरोप प्रत्यारोप दिखावा असल्याचे संजय निरुपम म्हणाले. शिवसेना हप्ताखोर पार्टी आहे, असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या हप्तेखोरांवर गुन्हा दाखल करावा. शिवसेनेवर कारवाई करण्याची ताकद आता भाजपाने दाखवावी, असं आव्हान संजय निरुपम यांनी केलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या