Advertisement

लाज वाटली पाहिजे, माॅब लिंचिंगमध्ये सामील भाजपचेच, सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

पालघरच्या दुर्देवी घटनेवरून भाजप धार्मिक राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करत आहे. याची भाजपला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

लाज वाटली पाहिजे, माॅब लिंचिंगमध्ये सामील भाजपचेच, सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
SHARES

पालघरच्या दुर्देवी घटनेवरून भाजप धार्मिक राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करत आहे. याची भाजपला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे. 

साधूंचा वेश पाहूनही माॅब थांबत नाही

पालघरच्या दुर्देवी घटनेवरून भाजप धार्मिक राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करत आहे. याची भाजपला लाज वाटली पाहिजे. गेल्या ५ वर्षात सत्तेत असताना धुळ्यात झालेली वा वर्षंभरापूर्वी पालघरलाच झालेल्या किंवा राज्यातील अन्य घटनांना पायबंद घालू न शकणारे आज यावर राजकारण करत आहेत हे गंभीर आहे!

चोरांच्या अफवेबरोबरच एक अफवा होती की काही मुस्लिम वेशांतर करून मुले पळवून किडनी काढतात वा विहिरीत थुंकून कोरोना पसरवतात. अशा अफवांनी समाजाला हिंसक बनवण्याचं कारस्थान देशात आजवर कोण करतंय? साधूंचा वेश पाहूनही मॉब थांबत नाही हे भयानक आहे. या अफवांमागे कोण आहे, याची चौकशी झाली पाहिजे.

हेही वाचा - पालघर हत्या: योगी आदित्यनाथांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, कडक कारवाईची मागणी

माॅब लिंचिंगमध्ये सामील भाजपचेच

मॉबलिंचिंगचे केंद्र असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहाजोगपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या घटनेवरून फोन केला.  पण 'दिवशी गडचिंचले' ग्रुप ग्रामपंचायत हा भाजपचा गड असून गेली १० वर्ष तिथे भाजपचा सरपंच आहे. सध्या भाजपाच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत. अटक केलेल्यांमध्ये बहुसंख्य भाजपाचेच आहेत. अशी माहिती देत सचिन सावंत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

योगींचा फोन

दरम्यान, पालघरच्या डहाणूमध्ये दोन साधू आणि एका ड्रायव्हरच्या हत्याप्रकरणाची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भातील माहिती योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. यांत ते म्हणतात की, महाराष्ट्रातील पालघरमध्ये जुना आखाड्याचे स्वामी कल्पवृक्ष गिरी आणि स्वामी सुशील गिरी तसंच त्यांचा ड्रायव्हर नीलेश तेलगडे यांची दुर्दैवी हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आणि या घटनेतील जाबाबदार आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? पालघर हत्या प्रकरणावरून फडणवीसांचा सवाल

अत्यंत घृणास्पद 

तर, पालघरचं माॅब लिंचिंगचं प्रकरण अत्यंत घृणास्पद आहे. ज्या प्रकारे लोकांनी पोलिसांच्या समोर अक्षरश: काठ्यांनी तुडवून मारलं आणि पोलीस काहीच करत नव्हते, ही अवस्था अत्यंत लज्जास्पद आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा या घटनेमुळे प्रश्न निर्माण होतोय. पोलीस कुणाच्या दबावाखाली आहे का असा प्रश्न देखील यामुळे तयार होतोय. त्यामुळे या घटनेची तात्काळ उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पोलिसांवर आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा