Advertisement

काँग्रेसचा प्रत्येक वाॅर्डात ‘जनता दरबार’, बीएमसी निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी

मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होत आहे. ही निवडणूक स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.

काँग्रेसचा प्रत्येक वाॅर्डात ‘जनता दरबार’, बीएमसी निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी
SHARES

मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होत आहे. ही निवडणूक स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत सर्व २२७ वाॅर्डांमध्ये काँग्रेस जनता दरबार घेणार आहे. मुंबईत काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’ हा १०० दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली.

जनता दरबारातून २२७ वाॅर्डांतील नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा काँग्रेस प्रयत्न करणार आहे. याबाबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांनी सांगितलं की, मुंबईत काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्न,समस्या सोडवण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येणार आहे.  या अभियानात सर्व २२७ प्रभागांमध्ये पदयात्रा काढल्या जातील.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने माझी मुंबई, माझी काँग्रेस‌ हा नारा दिला आहे. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पुढील १०० दिवसात प्रत्येक वॉर्डात जाऊ. तिथे जनता दरबार करु, लोकांची काम करु, त्यानंतर वरिष्ठांना २२७ जागा का लढायच्या हे सांगू.

 लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्ष सोडून गेलेल्यांपैकी काहींना पुन्हा काँग्रेसमध्ये परत यायचं आहे. १०० दिवसांच्या अभियानात पक्षात परत येऊ इच्छिणाऱ्यांना काँग्रेस पक्षात दाखल करून घेतले जाईल, असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे. 


हेही वाचा -

मुंबईच्या वेशीवर दोन महिन्यांनंतर फास्टॅग बंधनकारक

फायर बाईकसाठी पालिकेची निविदा, निमुळत्या जागेसाठी सोईस्कर

कोरोनाशी लढण्यासाठी पालिकेला हवेत ४०० कोटी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा