SHARE

मालाड – मुंबई महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांचे पक्षांतर सुरू आहे. या पक्षांतरात मालाड (प.) इथल्या एव्हरशाइन नगरच्या वॉर्ड क्र. 31 चे काँग्रेसचे नगरसेवक परमिंदर भामरा यांचाही समावेश असून त्यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. भामरा यांच्या पाठोपाठ मालाडमधील चेट्टी समाजाचे अध्यक्ष आरोक्य स्वामी चेट्टी आणि उपाध्यक्ष रॉबर्ट राजा, काँग्रेसचे वॉर्ड 47 चे ब्लॉक अध्यक्ष नरेंद्र वोरा यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

चेट्टी आणि वोरा, भामरा यांच्या आउटगोइंगमुळे काँग्रेसला मालाडमध्ये मोठा धक्का बसला आहे. मालाडमधील मोठ्या संख्येने असलेल्या चेट्टी तसेच पंजाबी समाजाची मते यंदा भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. परमिंदर भामरा यांचा वॉर्ड महिला राखीव झाला आहे. त्यात त्यांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती, मात्र पत्नीला उमेदवारी मिळणार नसल्यामुळे भामरा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे कळते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या