Advertisement

शेतकऱ्यांच्या समर्थनात मुंबईत काँग्रेसचं आंदोलन

देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या समर्थनात मुंबईत काँग्रेसचं आंदोलन
SHARES

कृषी कायद्याच्या विरोधात मुंबईसह देशभरात आंदोलन सुरू आहे. देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांच्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसनं आंदोलन केलं. मुंबईतील रिगल सिनेमाजवळ करण्यात आलेल्या आंदोलनात ऊर्जामंत्री नितीन राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुनिल केदार, धीरज देशमुख आदी उपस्थितीत होते.

'केंद्र सरकारनं शेतकऱ्यांविरोधात जे ३ काळे कायदे केले आहेत. ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही तर घातक आहेत. शेतकऱ्यांनी जी मागणी केली आहे. ती वननेश वन मार्केट ते योग्य होत. त्याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना न्याय देत होती. आता यांनी २ मार्केट या ठिकाणी आणले. शेतकऱ्यांचं पीक हे स्वत:च घेणार आणि शेतकऱ्यांना नाचवण्याच काम या कायद्याद्वारे होणार हे स्पष्टपणं दिसत आहे. या कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनात आम्ही मुंबईमध्ये आंदोलन करत आहोत’, असे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद' आंदोलनाला देशभरासह मुंबईतही सकारात्म प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतील अनेक परिसरातील दुकानदारांनी आपली दुकानं बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शिवाय, नेहमीच गर्दीचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणाऱ्या दादर परिसरातील ही दुकानं बंद आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी दादरमधील दुकानदारांनी मंगळवारी सकाळपासून दुकानं बंद ठेवली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा