Advertisement

मुंबई महापालिकेत एकटेच लढणार, काँग्रेसने दिला स्वबळाचा नारा

येऊ घातलेली मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेत एकटेच लढणार, काँग्रेसने दिला स्वबळाचा नारा
SHARES

विधान परिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही घटकपक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवतील असा अंदाज बांधण्यात येत होता. परंतु येऊ घातलेली मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

मुंबई काँग्रेसचे (congress) नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी २०२२ मध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस एकट्यानेच लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसनं ‘एकला चलो’चा नारा देत महापालिकेच्या सर्व २२७ जागा लढवण्याचं निश्चित केलं आहे. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने खास रणनिती आखल्याची माहिती देखील भाई जगताप यांनी दिली आहे. 

याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता भाई जगताप म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत (bmc) काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. महाराष्ट्रातील सत्तेत भलेही काँग्रेस सहभागी असली, तरी तिन्ही पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार किमान समान कार्यक्रमानुसार काम करत आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिका निवडणुकीचा काहीही संबंध नाही.  

हेही वाचा- पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही-नाही!

मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा एकहाती झेंडा फडकवण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डनिहाय १०० दिवसांची रणनीती आखण्यात आली आहे. मुंबईत पाणी माफियांचा सुळसुळाट झाल्याने गरिबांना पिण्याचं पाणी मिळत नाही. त्यामुळे मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत पाणी देण्याचा आमचा मानस आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर १६८ कोटींचा भार पडणार असला तरी हा निर्णय घेणं गरजेचं आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झोपडपट्टीवासीयांची घरं नियमित करण्याची घोषणा केली होती. त्याचं पुढं काहीही झालेलं नाही. त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. महापालिकेच्या प्रत्येक वाॅर्डात जनता दरबार घेऊन मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली.

(congress will contest bmc election independently says mumbai congress president bhai jagtap)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा