Advertisement

काँग्रेस करणार 'साला दानवे' आंदोलन


काँग्रेस करणार 'साला दानवे' आंदोलन
SHARES

तूर खरेदीवरुन शेतकऱ्यांना 'साले' म्हणून त्यांचा अपमान करणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जोरदार टीका केली. दानवेंनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. ही सत्तेची मस्ती आहे असं सांगत अशोक चव्हाण यांनी दानवेंच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच शुक्रवारपासून काँग्रेस राज्यात 'साला दानवे' आंदोलन करणार असल्याचं सांगत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन दानवेंना साला पदवी प्रदान करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं. भाजपाने शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी करत अशोक चव्हाण यांनी रावसाहेब दानवेंचे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचं सांगत दानवेंवर टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, अंजली दमानिया यांनी रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करुन त्याचा निषेध केला आहे.

<blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="en" dir="ltr">See the horrible language of BJP Chief of Maharashtra. Says,the Govt has bought back so much of Tur Dal still the 'SALA' farmers are crying? <a href="https://t.co/6m95armzxh">pic.twitter.com/6m95armzxh</a></p>— Mrs Anjali Damania (@anjali_damania) <a href="https://twitter.com/anjali_damania/status/862344449069907972">May 10, 2017</a></blockquote>
<script async src="//platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा