• काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळले 'मी नथुराम गोडसे..'चे पोस्टर
SHARE

मुलुंड - मुलुंड पश्चिममध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या मराठी नाटकाचं पोस्टर जाळून निषेध दर्शवला. ईशान्य मुंबई काँग्रेस सरचिटणीस राजेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली निदर्शने करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या वेळी नथुराम गोडसे यांच्याविरोधात नारेबाजीही केली. 30 जानेवारी म्हणजेच महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्याचा पवित्रा घेतला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या