मोदी करणार मुंबईत फ्री वायफायची घोषणा?

  मुंबई  -  

  मुंबई - नोटांच्या रांगेत ताटकळून कंटाळलेल्या मुंबईकरांना १९ नोव्हेंबरला मुंबईभेटीवर येणाऱ्या पंतप्रधान मोदींकडून फ्री वायफायची भेट मिळण्याची शक्यता आहे. तसं तर १ मे २०१७ पर्यंत म्हणजेच येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत मुंबईत १२०० फ्री हॉटस्पॉट झोन उभारण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारनं केली होती. मात्र, मोदींच्या मुंबई भेटीदरम्यान मेट्रोच्या नव्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाबरोबरच मुंबईला फ्री वायफायचं गिफ्ट देऊन नोटायणामुळं निर्माण झालेली नाराजी थोडी कमी करण्याची पॉलिटिकल मूव्ह खेळण्याची शक्यता आहे. केंद्रातल्या नरेंद्र सरकारला दिलासा देण्यासाठी राज्यातील देवेंद्र सरकारने आता मुंबईभर हॉटस्पॉट उभारण्यास सुरुवात केली आहे.

  आता, जिथे जिथे सीसीटीव्ही लागलेत तिथे तिथे वायफायच्याही इन्स्ट्रूमेंट्स दिसू लागल्या आहेत. गेटवे ऑफ इंडियापासून गिरगाव चौपाटी, मरिन ड्राइव्हपर्यंतच्या हॉटस्पॉट्सची यशस्वी चाचणीही पार पडल्याचे समजते. त्यामुळे मोदींच्या हस्तेच या प्रकल्पाचंही उद्घाटन करण्याचं धाडस भाजपाकडून होण्याची शक्यता आहे.
  शहर आणि उपनगरांतल्या काही रेल्वेस्थानकांवर सुरू झालेल्या वायफाय सुविधेचा पूर्वेतिहास पाहता मुंबईत वायफाय फ्री झाल्यास काय होईल, याबाबत आत्ताच काही न बोललेलं बरं. परंतु, पंतप्रधानांच्या हस्ते या सेवेचं उद्घाटन झाल्यास स्मार्ट सिटी म्हणून विकासाच्या वाटेवर धावू लागलेल्या मुंबईला एक बूस्ट मिळेल यात शंका नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.