Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या दारात पोहोचला कोरोना, मातोश्री परिसर सील

वांद्रेच्या प्रसिद्ध कलानगरमध्ये मातोश्री आहे. कलानगर बाहेर असलेल्या चहा विक्रेत्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

मुख्यमंत्र्यांच्या दारात पोहोचला कोरोना, मातोश्री परिसर सील
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' च्या आसपासचा संपुर्ण परिसर बीएमसीकडून आज तातडीनं सील करण्यात आला आहे.

वांद्रेच्या प्रसिद्ध कलानगरमध्ये मातोश्री आहे. कलानगर बाहेर असलेल्या चहा विक्रेत्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं BMCने ही खबरदारी घेतली आहे. ही टपरी मातोश्री पासून जवळच आहे. या संपूर्ण भागात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. पोलीस आणि पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ड्रायव्हरला सुट्टी दिली होती. ते स्वत:च कार चालवत बैठकांना उपस्थित राहत आहेत. भेटी गाठीही त्यांनी या आधीच बंद केल्या असून फक्त महत्त्वाच्या बैठकांनाच ते उपस्थित राहत आहेत. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहे.

देशात लॉकडाउन असूनही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६९३ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. काल दिवसभरात ३० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आज आत्तापर्यंत २ मृत्यू नोंदवले गेले आहेत. २४ तासांतल्या या ३२ मृत्यूंमुळे भारतात कोरोनाबळींची संख्यासुद्धा १०९ वर पोहोचली आहे.

दरम्यान कोरोनाचा हा संसर्ग आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांपर्यंत पोहचला आहे. कुरार पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याची कोरोनाची टेस्ट पाँझिटीव्ह आल्याने त्यांच्यासोबत असलेल्या आता इतर पोलिस कर्मचाऱ्यांची आता कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.

उत्तर मुंबईत कायम नागरिकांच्या गर्दीने व्यापलेले पोलिस ठाणे म्हणून कुरार पोलिस ठाण्याची ओळख आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारा बहुतांश भाग हा झोपडपट्टी परिसर आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात कायमच वर्दळ असते. मुंबईत सध्या कोरोना या संसर्ग रोगाने थैमान घातल्यामुळे संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहे. या संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की, नागरिकांच्या सुरक्षेस असलेल्या नर्स, डाँक्टर आणि पोलिसांना या रोगाने आता जखडण्यास सुरूवात केली आहे.हेही वाचा

मोदी सरकारचा धाडसी निर्णय, खासदारांची वर्षभरासाठी ‘इतकी’ वेतन कपात

कम्युनिटी किचनचा निर्णय अव्यवहार्य, रेशनकार्ड नसलेल्यांनाही धान्य द्या- अतुल भातखळकर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा