Advertisement

कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांना १७१ कोटींचा निधी

कोरोना प्रतिबंधासाठी (corona privention) आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री, साहित्य व औषधे खरेदी करण्यासाठी विभागीय आयुक्तांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आतापर्यंत एकूण १७१ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांना १७१ कोटींचा निधी
SHARES

कोरोना प्रतिबंधासाठी (corona privention) आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री, साहित्य व औषधे खरेदी करण्यासाठी विभागीय आयुक्तांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आतापर्यंत एकूण १७१ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिली.

निधी वाटपाचे निर्देश

कोरोना विषाणूचा (coronavirus) राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता निधी (fund distrubution) वाटपाच्या संदर्भात आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बैठक घेतली. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी चर्चा करून विभागीय आयुक्तांना तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही. असं आश्वासन वडेट्टीवार यांनी दिलं.

हेही वाचा - बांधकाम प्रकल्प सुरू करू द्या, विकासकांनी साधला आदित्य ठाकरेंशी संवाद

किती निधी वाटप?

कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री, साहित्य व औषधे खरेदी करण्यासाठी विभागीय आयुक्तांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तीन टप्प्यात निधी वितरीत करण्यात आला आहे. पहिल्या टप्यात कोकण विभागासाठी १५ कोटी, पुणे विभागासाठी १० कोटी, नागपूर विभागासाठी ५ कोटी, अमरावती विभागासाठी ५ कोटी, औरंगाबाद विभागासाठी ५ कोटी, नाशिक विभागासाठी ५ कोटी याप्रमाणे ४५ कोटी निधी वितरीत केला. तर दुसऱ्या टप्यात कोकण विभागासाठी १५ कोटी, पुणे विभागासाठी १० कोटी, नागपूर विभागासाठी ५ कोटी, अमरावती विभागासाठी ५ कोटी, औरंगाबाद विभागासाठी ५ कोटी, नाशिक विभागासाठी ५ याप्रमाणे ४५ कोटी निधी देण्यात आला आहे. असे एकूण ९० कोटी आणि तिसऱ्या टप्यात ८१ कोटी असा आतापर्यंत एकूण १७१ कोटी रुपयांचा निधी विभागीय आयुक्तांना (maharashtra divisional commissioner) देण्यात आल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

निधी खर्च कुठे?

या निधीतून करोनाबाधित व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी, छाननीसाठी सहाय्य, अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटिलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करता येणार आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा