Advertisement

राज्यात १५ दिवसांत ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल धान्याचं वाटप- छगन भुजबळ

१ ते १५ एप्रिल २०२० या १५ दिवसांत राज्यातील १ कोटी ३५ लाख ५४ हजार ४४१ शिधापत्रिका धारकांना तब्बल ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल अन्नधान्याचं वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात १५ दिवसांत ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल धान्याचं वाटप- छगन भुजबळ
SHARES

राज्यातील ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचं वितरण सुरळीत सुरु असून १ ते १५ एप्रिल २०२० या १५ दिवसांत  राज्यातील १ कोटी ३५ लाख ५४ हजार ४४१ शिधापत्रिका धारकांना तब्बल ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल अन्नधान्याचं वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.      

राज्यात या योजनेमधून सुमारे १८ लाख ५१ हजार ०४३ क्विंटल गहू, १४  लाख २८ हजार ५४५ क्विंटल तांदूळ, तर १७ हजार १२१ क्विंटल साखरेचं वाटप करण्यात आलं आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ६ लाख ६८ हजार ६२२ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतलं आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत ३ एप्रिलपासून पात्र रेशनकार्डधारकांना मोफत तांदूळ वितरित करण्यात येत असून १० लाख ८० हजार २१० क्विंटल तांदुळाचं वाटप करण्यात आलं आहे. या योजनेसाठी ३५ लाख ८२० क्विंटल तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतलं जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिलं जाणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा