Advertisement

आधी कोरोनाकडे लक्ष द्या, मगच…, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

वर्ल्ड रेकाॅर्डवर नंतर बोला, आधी कोरोनाच्या संकटातून सगळ्यांना बाहेर काढा, असं नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला सुचवलं आहे.

आधी कोरोनाकडे लक्ष द्या, मगच…, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार
SHARES

कोरोना संकटाच्या काळात राजकारण करणारा जगातील एकमेव पक्ष अशी भाजपवर टीका करणारे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांना भाजप नेते नितेश राणे (bjp mla nitesh rane) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वर्ल्ड रेकाॅर्डवर नंतर बोला, आधी कोरोनाच्या संकटातून सगळ्यांना बाहेर काढा, असं नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला सुचवलं आहे.

कोरोनाची परिस्थिती (coronavirus) हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (mahavikas aghadi government) सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत, भाजपने (bjp protest) सरकारविरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनावर टीका करताना राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांनी कोरोनाच्या संकटात राजकारण करणारा भाजप हा एकमेव पक्ष असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा - लज्जास्पद! कोरोनाच्या संकटात राजकारण करणारा जगातला एकमेव पक्ष, आदित्य ठाकरेंनी भाजपला सुनावलं

कोरोना संकटाच्या (covid-19 pendamic) काळात जगभरातील लोकं आपापसातील भेदभाव, द्वेष विसरून एकमेकांच्या हातात हात घालून या संकटाशी मुकाबला करत असताना महाराष्ट्रातील एक पक्ष मात्र समाजात भीती पसरवून राजकारण करत आहे. जगावर आपत्ती आल्याचं विसरून या परिस्थितीतही केवळ राजकारण करणारा हा जगातील एकमेव पक्ष आहे. यातून या पक्षाने आपली पातळी किती घसरलीय याचा जागतिक विक्रम नोंदवला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

त्याला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वर्ल्ड रेकाॅर्ड आणि नितीमत्तेवर बोलू नये. कारण कणाहीन मुख्यमंत्र्यांमुळेच महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. न्यूयाॅर्कशी तुलना करता आता थोडी लाज बाळगा आणि खरं काम करून आम्हाला कोरोनाच्या संकटातून वाचवा. अशा शब्दांत राणे यांनी ठाकरे यांना सुनावलं आहे. 

हेही वाचा - एरवी निलेश राणेंची दखल घेण्याची गरज नाही, पण... प्रकाश आंबेडकरांनी सुनावले खडेबोल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा